News Cover Image

कथाकथन स्पर्धेत दोन विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक

कथाकथन स्पर्धेत दोन विद्यार्थ्यांनी पटकावला प्रथम क्रमांक
पेठ, दि. १५- डांग सेवा मंडळ नाशिक व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अभोणा  येथे कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील मानभाव पुर्वा इयत्ता ७ वी व वाघमारे मयुरी जनार्दन इयत्ता ९ या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष मा. ताईसाहेब, सचिव ऍड. मा.मृणालताई जोशी व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर एम, उपमुख्याध्यापक श्री मोरे एम एस, पर्यवेक्षक श्री केला डी जी, उपप्राचार्य श्रीमती आचार्य व्हीं सी, श्री वेढणे पी आर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही मनापासून अभिनंदन केले. 
      या विद्यार्थ्यांना श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्री जनार्दन वाघमारे व श्री निलेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 
    ही स्पर्धा प्रथम ४ ऑक्टोबर रोजी विद्यालयात घेण्यात आली. त्यातून ५ ते ९ पर्यंतचे प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना यास्पर्धेसाठी सहभागी करून घेण्यात आले.